फलाट तिकीट दरात आजपासून तात्पुरती वाढ – १० रुपयांचे तिकीट आता ५० रुपयांना
मुंबई दि.२३ :- मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेतर्फे काही प्रमुख स्थानकांवरील फलाट तिकीट दरात तात्पुरती वाढ करण्यात आली आहे. रविवार, २३ ऑक्टोबरच्या सकाळपासूनच हे नवीन दर लागू करण्यात आले. फलाट तिकीट १० रुपयांवरून आता ५० रुपये झाले आहे. ही दरवाढ येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे.
हेही वाचा :- एसटी महामंडळाची आजपासून हंगामी भाडेवाढ
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल तर पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, दादर ,बोरीवली, वांद्रे टर्मिनस या स्थानकांचा समावेश आहे. सणासुदीच्या काळात, रेल्वे स्थानकांवर गर्दीच्या वेळी होणारा गोंधळ टाळण्यासाठी आणि अनावश्यक लोकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.