‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’त प्रशांत दामले – उद्या (सोमवारी) सोनी मराठीवर प्रसारण
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२३ :- सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या उद्या (२४ ऑक्टोबर) प्रसारित होणा-या कार्यक्रमात अभिनेते प्रशांत दामले यांचा विशेष अतिथी म्हणून सहभाग आहे. प्रशांत दामले यांनी काम केलेल्या नाटकाचे आजवर १२,५०० प्रयोग पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त दामले यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.
हेही वाचा :- ‘इफ्फी’ २०२२ भारतीय पॅनोरमात चार मराठी चित्रपट
यावेळी त्यांनी चाहत्यांशी संवाद साधला. तसेच हास्यजत्रेच्या एका प्रहसनातही ते सहभागी झाले. दामले त्यांच्या अत्यंत व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून प्रहसनाच्या तालमीला हजर राहिले. सलग चार ते पाच तास सगळय़ा कलावंतांबरोबर त्यांनी तालीमही केली.
या प्रहसनात त्यांच्याबरोबर प्राजक्ता माळी, समीर चौगुले, शिवानी परब, ओंकार राऊत, चेतना भट सहभागी झाले होते. हा भाग
२४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता ‘सोनी मराठी’ वाहिनीवर प्रसारित होणार आहे.