‘इस्रो’तर्फे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण
नवी दिल्ली दि.२३ :- भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने दिवाळीच्या मुहूर्तावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इस्रोतर्फे रविवारी सर्वात वजनदार रॉकेट असलेल्या LVM-3 द्वारे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण करण्यात आले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटायेथून मध्यरात्री १२ वाजून ०७ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले. या पहिल्या व्यावसायिक प्रक्षेपणाद्वारे ३६ OneWeb उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.
हेही वाचा :- ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’त प्रशांत दामले – उद्या (सोमवारी) सोनी मराठीवर प्रसारण
LVM-3 हे रॉकेट ४३.५ मीटर लांब असून आणि त्यात आठ हजार किलोपर्यंत उपग्रह वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच २०२३ मध्येही LVM-3 द्वारे आणखी ३६ OneWeb उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत. ब्रिटनबरोबर झालेल्या १०८ उपग्रहांच्या करारांतर्गत पहिल्या टप्प्यात ३६ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली.