नैऋत्य मौसमी वारे दोन दिवसात राज्यातून माघारी
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२२ :- नैऋत्य मोसमी वारे येत्या दोन दिवसात मुंबईसह संपूर्ण राज्यातून माघारी जातील असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. महाराजातून मोसमी वारे १३ ऑक्टोबरपर्यंत निघून जाणे अपेक्षित असते. यंदा त्यांना उशीर झाला. बाष्पाचे प्रमाण कमी होत नसल्याने मुंबईसह राज्यातून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास लांबला आहे. १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातून मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. राज्याच्या उत्तरेकडील काही भागातून मोसमी वारे माघारी गेले आहेत.
हेही वाचा :- यंदा ९ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम?
मात्र अरबी समुद्रातील बाष्पामुळे मोजणी वाऱ्यांचा परतीचा प्रवास आठ ते दहा दिवसांनी लांबला आहे. दरम्यान दिवाळीच्या कालावधीत बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्राला बसणार नसल्याचे सांगण्यात आले. बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून दोन दिवसात त्याची तीव्रता वाढणार आहे २५ ऑक्टोबर रोजी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा पश्चिम बंगालला सर्वाधिक तडाखा बसण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.