मुंबईत ५१ हजार किलोहून अधिक भेसळयुक्त खाद्यतेल, वनस्पती तूप जप्त
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२२ :- अन्न आणि औषध प्रशासनाकडून मुंबईतून ५१ हजार किलो भेसळयुक्त खाद्यतेल आणि वनस्पती तुपाचा साठा जप्त करण्यात आला. या मालाची बाजारातील किंमत सुमारे एक कोटी चार लाख चौदा हजार रुपये इतकी आहे.
हेही वाचा :- केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला महाराष्ट्रात पुन्हा तपासाची मुभा
अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईत दहिसर कुर्ला गोवंडी भायखळा आणि घाटकोपर येथे छापा टाकून हे भेसळयुक्त खाद्यतेल आणि वनस्पती तूप जप्त केले. जप्त करण्यात आलेले नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाकडून दरवर्षी ऑगस्ट ते ३१ डिसेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येते.