‘इफ्फी’ २०२२ भारतीय पॅनोरमात चार मराठी चित्रपट
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२२ :- भारताच्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय पॅनोरमात देशभरातील विविध भाषांmumbaiतील मिळून ३५४ चित्रपट दाखल झाले होते. त्यात चार मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. विक्रम पटवर्धन दिग्दर्शित ‘फोटो फ्रेम’, डाॅ. सलिल कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं?’ आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज ‘ हे पॅनोरमाच्या मुख्य विभागासाठी निवडले गेले.
हेही वाचा :- मुंबई शेअर बाजारात २४ ऑक्टोबरला मुहूर्ताचे सौदे
तर उत्तम व्यावसायिक यश या विभागात प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. पॅनोरमा विभागात हिंदी, बंगाली, मल्याळम इत्यादी भाषांतील चित्रपटांप्रमाणेच इरुला, मैथिली या भाषांतील मिळून पंचवीस चित्रपट निवडण्यात आले. नाॅन फिचर फिल्म विभागात वीस लघुपट निवडण्यात आले असून भूतिया, कोंकणी, संस्कृत या भाषांतील लघुपट निवडण्यात आले आहेत.