केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला महाराष्ट्रात पुन्हा तपासाची मुभा
मुंबई दि.२२ :- केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) राज्यात कोणत्याही गुन्ह्याच्या तपासासाठी आता राज्य सरकारच्या पूर्वपरवानगीची गरज भासणार नाही. महाविकास आघाडी सरकारने रद्द केलेले ही परवानगी शिंदे- फडणवीस सरकारने पुन्हा दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.
हेही वाचा :- संजय राऊत, अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच
केंद्रीय तपास यंत्रणांचा राज्यातील हस्तक्षेप रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने २१ ऑक्टोबर २०२० रोजी ‘सीबीआय’ला राज्यातील कोणत्या गुन्ह्यासाठी पूर्वपरवानगी घेणे गरजेचे असल्याची तरतूद केली होती. केंद्रामध्ये भाजपचे सरकार असून केंद्रीय तपास यंत्रणा विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करत असल्याचे आरोप करण्यात आले होते. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सीबीआय’ला महाराष्ट्रात तपासाची मुभा पुन्हा देण्याचे ठरविले.