संजय राऊत, अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२१ :- शिवसेना खासदार संजय राऊत आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख या दोघांनाही यंदाची दिवाळी तुरुंगातच साजरी करावी लागणार आहे. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आता थेट २ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याने त्यांना २ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. राऊत यांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ने अटक केली होती.
हेही वाचा :- कडोंमपा निवडणुकीत ‘नोटा’चा वापर करा.. – शेखर जोशी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही दिलासा मिळाला नाही. त्यांचा जामीन अर्ज ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाने फेटाळला. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अनिल देशमुख यांना जामीन मिळाला होता. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यावरुनच ‘सीबीआय’ने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणातही जामीन मिळावा अशी याचिका अनिल देशमुख यांच्या वतीने करण्यात आली होती. न्यायालयाने शुक्रवारी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.