राज्याच्या आरोग्य विभागात महाभरती! – दहा हजारांहून अधिक जागांसाठीचे वेळापत्रक जाहीर
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२१ :- राज्याच्या आरोग्य विभागात लवकरच महाभरती केली. जाणार असून दहा हजारांहून अधिक जागांसाठीचे वेळापत्रक
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. मार्च २०१८मध्ये आरोग्य विभागाच्या १३ हजार जागांसाठी भरती करण्यात येणार होती. साडेअकरा लाख विद्यार्थ्यांनी अर्जही दाखल केले, परीक्षाशुल्कही भरले. मात्र करोना, आरक्षणाच्या अडचणी यामुळे या भरतीकडे दुर्लक्ष झाले. आरोग्य विभागाशी संबंधित १० हजार १२७ जागा भरल्या जाणार आहेत.
हेही वाचा :- दहा लाख तरुणांसाठी उद्या रोजगार महामेळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ
यामध्ये आरोग्यसेवक, लॅब टेक्निशियन अशा जागांचा समावेश असल्याचे महाजन म्हणाले. मार्च २०२३ मध्ये या परीक्षा होणार असून सर्व प्रक्रिया पूर्ण करून एप्रिल महिन्यात उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. १ ते ७ जानेवारी २०२३ दरम्यान या प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल. २५ ते ३० जानेवारीदरम्यान अर्जांची छाननी होऊन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान वैध ठरलेल्या अर्जांची यादी जाहीर केली जाईल. २५ मार्च आणि २६ मार्च या दोन दिवसांत परीक्षा होणार असून २७ मार्च ते २७ एप्रिलपर्यंत निकाल जाहीर करून उमेदवारांची नेमणूक केली जाईल, असेही महाजन यांनी सांगितले.