‘निती’ आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मित्र’ ची स्थापना
मुंबई दि.२१ :- ‘निती’ आयोगाच्या धर्तीवर ‘महाराष्ट्र इन्स्टिटय़ुशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र)’ ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा :- दहा लाख तरुणांसाठी उद्या रोजगार महामेळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ
कृषी व संलग्न क्षेत्र, आरोग्य व पोषण, शिक्षण, कौशल्य विकास व नाविन्यता, नागरीकरण व बांधकाम क्षेत्र विकास आणि भूमी प्रशासन, वित्त, पर्यटन आणि क्रीडा, ऊर्जा संक्रमण आणि वातावरणीय बदल, उद्योग आणि लघु उद्योग, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, पूरक सेवा व दळणवळण या पारंपारिक क्षेत्रावर ‘मित्र’ द्वारे लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या क्षेत्रांच्या प्रभावी अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी पूरक असणारे नावीन्यपूर्ण क्षेत्र- ड्रोन टेक्नॉलॉजी, कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, रोबोटिक्स, ब्लॉक चेन यांचादेखील यात समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा :- मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची निवड
‘मित्र’ला मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ आणि दैनंदिन कामकाजासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी मंडळ असणार आहे. नियामक मंडळात उपमुख्यमंत्री सहअध्यक्ष असतील आणि उपाध्यक्षपदी तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती केली जाणार आहे.