मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची निवड
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२१ :- मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ‘भाजप’चे आशिष शेलार यांच्या गटाचे अमोल काळे यांची निवड झाली आहे. काळे यांना १८१ तर त्यांचे प्रतिस्पर्धी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना १२८ मध्ये मिळाली.
हेही वाचा :- दहा लाख तरुणांसाठी उद्या रोजगार महामेळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ
अमोल काळे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. शरद पवार, आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळे यांना पाठिंबा दिला होता.