सामाजिक

फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक….

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.२० – फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली. स्मारक उभारणीची संकल्पना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे.‌

हेही वाचा :- एमएमआरडीए’च्या बैठकीत विविध प्रकल्प मेट्रो,रस्ते,वाहतूक प्रकल्पांना मान्यता

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीश पहारेकऱ्यांना चुकवून फ्रान्सच्या समुद्रात मार्सेलीस बंदराजवळ “मोरिया” बोटीवरून ८ जुलै, १९२० रोजी मारलेली उडी त्रिखंडात गाजली. हा दिवस ‘साहस दिन’ म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या या ऐतिहासिक उडीला ८ जुलै, २०२२ रोजी ११२ वर्षे पूर्ण झाली. ते औचित्य साधून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये त्यांच्या तैलचित्राचे अनावरण ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.

हेही वाचा :- संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ डोंबिवलीत पुन्हा अवतरणार!

याप्रसंगी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी फ्रान्सच्या किनाऱ्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक व्हावे, त्यासाठी विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. ॲड. नार्वेकर यांनी यावेळी बोलताना यासंदर्भात आपण व्यक्तिश: लक्ष घालून पाठपुरावा करू असे आश्वासन दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *