नालेसफाई आणि गटारे व्यवस्थित साफ न केल्यास आणि पाणी तुंबल्यास प्रतिघटना २० हजार रुपये दंड
ठाणे दि.०६ :- नालेसफाई आणि गटारे व्यवस्थित साफ न केल्यास जर पाणी तुंबले तर प्रतिघटना २० हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद ठाणे महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत करण्यात आली आहे. ठाणे महापालिका हद्दीत सुमारे ३०८ कीलोमीटर अंतराचे १२९ छोटे आणि मोठे नाले आहेत.
एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवाशाला विंचवाचा चावा
वर्षभर नालेसफाई होत असली तरी पावसाळ्यापूर्वी घनकचरा विभागामार्फत नाल्यांची सफाई करण्यात येते. पावसाळ्यात पाणी साठू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जाते. ठाणे महापालिका हद्दीत वर्तकनगर प्रभाग समिती वगळता इतर आठही प्रभाग समित्यांमध्ये नालेसफाईचे काम सुरू झाले आहे.
बारसू रिफायनरीविरोधात उपनगरीय रेल्वे रेल्वे स्थानकांवर फलक, भित्तीपत्रकांद्वारे निषेध
नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांमध्ये नाल्याच्या काठावरून हटवणे, त्यावर जंतुनाशक व दुर्गंधीनाशक फवारणीच्या अटी निविदेत टाकण्यात आल्या आहेत. नालेसफाई करताना त्यात जलवाहिन्या, वीजवाहिन्या येतात. त्यामुळे या सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे, अशा सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत.