हरिश्चंद्रगड येथे कल्याणचे 20 ट्रेकर्स अडकले

एनडीआरएफच्या मदतीने सुटका करण्याचे प्रयत्न सुरू

ठाणे दि 25: कल्याणचे डॉ हितेश अडवाणी हे 20 जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंग साठी गेले असता तेथून पुढे दीड किलोमीटर कोकणकडा येथे 1000 फूट खाली हे सर्व ट्रेकर अडकले आहेत. या ट्रेकर्सना एनडीआरएफच्या मदतीने वाचविण्याचे प्रयत्न सुरू असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तहसीलदार आणि पोलीस यांना देखील यासंदर्भात समन्वय ठेऊन ट्रेकर्सची सुटका कशी होईल ते पाहण्यास सांगितले आहे

हेही वाचा :- गाडी चालवताना मोबाईलवर बोलणा-याचा परवाना रद्द होणार

 डॉ अडवाणी यांचेशी संपर्क झाला असून त्यांच्यासोबत 5 महिला व 17 पुरुष आहेत. कोकणकडा पासून खाली 800 फूट ते आहेत. अंधार असल्याने त्यांना मार्ग सापडत नाही. त्यामुळे बचाव पथकाला त्यांचे नेमके लोकेशन पाठवण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे ग्रामीण पोलीस तसेच जुन्नर पोलीस यांना देखील या घटनेविषयी कळविले असून तहसीलदार अमित सानप या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email