1993 च्या बॉम्ब स्फोटातील एके ५६ रायफल सह तिन जणांना अटक
(म.विजय)
ठाणे दि.०८ – ठाणे साकेत येथे दोन इसम ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर ठाणे खंडणी विरोधी पथकाचे मिळाली, त्या प्रमाणे त्यांनी सापळा रचून जाहिद अली शौकत काश्मिरी वय 47 व संजय बिपीन श्रॉफ वय 47 यांना शिताफीने ताब्यात घेतले त्यांची अंगझडति घेतली असता त्या दोघांकडे 5 -5 ग्रँम कोकिन सापडले त्या प्रमाणे त्यांच्या वर एन .डी .पी .एस . कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला , त्या तील मुख्य आरोपी जाहिद अली याच्या कडे सखोल चौकशी केली असता त्याने दिलेल्या निवेदनावरून मुंबई येथील कुख्यात दाऊद गँगचा सदस्य नईम फहीम खान याच्या बांगुर नगर येथील घरामध्ये त्याची पत्नी यास्मिन नईम खान वय 35 वर्ष हिच्या कडे एके 56 रायफल आहे असे समजले त्या प्रमाणे क्रांती चाळ , भगतसिंगनगर गोरेगाव मुंबई येथे ती राहत असलेल्या घरी छापा घातला असता तिच्या घरातुन एके 56 रायफल तीन मँगझीन , 95 जिवंत काडतुसे , 9 एम एमचे दोन पिस्तोल व 13 जिवंत काडतुसे ताब्यात घेण्यात आली व यास्मिन हीला अटक करण्यात आली, या महिलेचा पती आरोपी नईम खान हा दाउद टोळीशी संलग्न असुन छोटा शकील साठी काम करतो , या नईम खानला दिनांक 20/04/2016 मध्ये मुंबई गुन्हे शाखेने पकडले आहे , त्या वेळी त्याच्यावर 302,120(b) प्रमाणे कारवाई करण्यात आली होती, त्या गुन्हय़ात चार आरोपी अटक असुन , छोटा शकील च्या सांगण्यावरून इक्बाल अत्तरवाला याला ठार मारण्यासाठी आले असताना त्यांना अटक करण्यात आली होती , हे सगळे आरोपी ठाणा जेल मध्ये बंद आहेत , जाहिद अली शौकत ह्याची नागपाडा येथे स्वतःची काश्मिरी अपार्टमेंट नावाची बिल्डिंग आहे , त्याला व्यायामाची हौस असल्यामुळे त्याने तिथेच स्वतःची जिम सुरु केली होती , त्या दरम्यान त्याची ओळख नवी मुंबई येथील एका निग्रो शी झाली त्याने जाहीद याला नशेची सवय लावली , नशेच्या आहारी गेलेल्या जाहिद नंतर स्वतःच ड्रग्ज विकायला लागला , चार पाच ग्रँम पासून दहा ग्रँम पर्यंत ड्रुग्ज विकायला त्याने सुरुवात केली , 4000 रुपये एक ग्राम या भावाने तो ड्रुग्ज विकायचा , गिऱ्हाईक मिळवण्यासाठी त्याने स्वतःहाच्या जिम मध्ये येणाऱया लोकांनाच ड्रुग्ज विकायला सुरुवात केली , हळू हळू त्याने ठाणे , मुंब्रा येथे सुद्धा ड्रुग्ज विकायला सुरुवात केली.
यास्मिन नईम खान ही मराठी मुलगी तिचे नाव दीपा सुर्वे ही नईम खानच्या संपर्क आली त्यांच प्रेम जमल नंतर लग्न झाल आणी दीपाची यास्मिन झाली नईम खान हाच घरात कमवता होता तो जेल मध्ये गेल्या नंतर यास्मिन हीला पैशाची चणचण होती, जाहिद तिच्या घरी ड्रुग्जचा साठा ठेवत असे व त्यातील पाच दहा ग्रँम ड्रुग्ज विकत असे, नईम खान जेल मध्ये गेल्यापासून यास्मिन हिची आर्थिक परिस्थिती बिकट होती, जाहिद हा तिला त्याबद्दल पैस्रे द्यायचा, ठाणे पोलीसांनी तिथे छापा मारायच्या अगोदर तो ड्रुग्जचा साठा त्यांनी गायब केला.
मुंबई पोलीसांनी जेव्हा नईम खानला अटक केली होती तेव्हा त्याच्या घरच्या झडति मध्ये पाच रिव्हॉल्वर सापडले होते , तेव्हा एके 56 त्याने अन्य जागी हलवली होती , तीन महिन्या पूर्वी जाहिद याने ती परत नईम खान याच्या घरी नेऊन ठेवली. 1997 च्या व्रुत्तपत्रा मध्ये गुंडाळून खूप दिवस ठेवल्या मुळे गंज पकडलेल्या अवस्थेत ती पोलीसांना सापडली , विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहीती नुसार 1993 च्या बॉम्ब स्फोटादरम्यान मिसिंग असलेल्या तीन एके 56 पैकी ही एक एके 56 गन आहे.