देशात अजूनही १८ कोटी नागरिक निरक्षर

मुंबई दि.१८ :- भारतात १८ कोटी नागरिक अद्याप निरक्षर असल्याचे समोर आले आहे. केंद्र शासनाने येत्या आठ वर्षांत संपूर्ण देश साक्षर करण्याचे ठरविले असून, त्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम राबिवण्यात येणार आहे.

हेही वाचा :-  हिंदु जनजागृती समितीतर्फे ‘हलाल मुक्त दिवाळी’ आंदोलन

२०११ च्या जनगणनेनुसार देशात १५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील निरक्षरांची संख्या २५ कोटी ७६ लाख होती. त्यात ९ कोटी ८ लाख पुरुषांचा आणि १६ कोटी ६८ लाख महिलांचा समावेश होता.

हेही वाचा :- दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीच्या ताफ्यात ११० बस दाखल होणार

२००९-१० ते २०१७-१८ या दरम्यान राबविण्यात आलेल्या साक्षर भारत कार्यक्रमांतर्गत ७ कोटी ६४ लाख लोक साक्षर झाल्याची नोंद करण्यात आली. म्हणजे देशात अजूनही १८ कोटी १२ लाख लोक निरक्षर आहेत.

हेही वाचा :- युवकांनी स्वतःच्या क्षमतेबाबत आत्मविश्वास बाळगावा- भगतसिंह कोश्यारी

देशातील निरक्षरतेची ही परिस्थिती विचारात घेऊन येत्या २०३० वर्षापर्यंत शंभर टक्के साक्षरता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठरवविण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा :- सावधान ! मुंबईत डोळ्यांची साथ

या कार्यक्रमांतर्गत देशातील १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करण्यात येणार आहे. तसेच आर्थिक साक्षरता, कायदेविषयक, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्याची काळजी, कुटुंब कल्याण याचीही माहिती करून दिली जाणार आहे.

हेही वाचा :- मुंबई महापालिका हेच लक्ष्य, अंधेरी पोटनिवडणुकीकडे दुर्लक्ष – शेखर जोशी

Leave a Reply

Your email address will not be published.