जानेवारी २०२० मध्ये १,१०,८२८ कोटी रुपये जीएसटी सकल महसूल संकलित

नवी दिल्ली :- जानेवारी, २०२० मध्ये जमा झालेला एकूण जीएसटी महसूल १,१०,८२८ कोटी रुपये आहे, त्यापैकी सीजीएसटी २०,९४४ कोटी रुपये हे, एसजीएसटी २८,२२४ कोटी रुपये आहे, आयजीएसटी ५३,०१३ कोटी रुपये आहे (आयातीवर २३,४८१ कोटी रुपये संकलनासह ) आणि सेस ८,६३७ कोटी रुपये (आयातीवर 824 कोटी रुपयांसह ). ३१ जानेवारी, २०२० पर्यंत डिसेंबर महिन्यात दाखल झालेल्या जीएसटीआर ३ बी विवरणपत्रांची एकूण संख्या ८३ लाख (अंदाजे) आहे.

हेही वाचा :- Kalyan ; भर वर्दळीतून रिक्षा गायब

सरकारने सीजीएसटीला २४,७३० कोटी आणि आयजीएसटी कडून एसजीएसटीला १८,१९९ कोटी रुपये दिले आहेत. जानेवारी, २०२० मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी कमावलेला महसूल सीजीएसटीसाठी ४५,६७४ कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी ४६,४३३ कोटी रुपये इतका आहे.

हेही वाचा :- तालसंग्राम ढोल-ताशा स्पर्धेला राज्यभरातून १३ पथकांचा समावेश कल्याण-डोंबिवलीकर रसिकप्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जानेवारी २०२९ च्या तुलनेत जानेवारी २०२० मध्ये देशांतर्गत व्यवहारांमध्ये १२ टक्के लक्षणीय वाढ झाली आहे. वस्तूंच्या आयातीद्वारे संकलित महसूल लक्षात घेतला तर एकूण महसूल ८ टक्के अधिक आहे. जानेवारी २०२० मध्ये आयातीवरील आयजीएसटीने नकारात्मक वाढ नोंदवली आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर ही दुसरी वेळ आहे जेव्हा मासिक महसूल १.१ लाख कोटी आहे आणि वर्षभरात सहाव्यांदा एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email