दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीच्या ताफ्यात ११० बस दाखल होणार

मुंबई दि.१८ :- दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ११० ‘परिवर्तन’ बस दाखल होणार आहेत. या बस भाडेतत्त्वार घेण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.‌

हेही वाचा :- दिवाळी सुट्टीनिमित्त एसटीची हंगामी भाडेवाढ

एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १३ हजार साध्या प्रकारातील बसगाड्या आहे. याशिवाय निमआराम, स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावरील शिवशाही, शिवनेरी, अश्वामेध गाड्याही आहेत.

हेही वाचा :- दिवाळी सुट्टीनिमित्त, एसटीच्या विशेष गाड्या

दरवर्षी महामंडळाच्या ताफ्यातून कालमर्यादा संपल्याने सुमारे हजार बसगाड्या भंगारात काढल्या जातात. गेल्या दोन ते तीन वर्षात कालमर्यादा संपलेल्या बस भंगारात काढल्या गेल्या. परंतुु निधीचा अभाव आणि करोनाचे संकट यांमुळे नवीन बस ताफ्यात दाखल करता आल्या नाहीत. त्यामुळे महामंडळाने नवीन साध्या प्रकारातील ७०० स्वमालकीच्या आणि ५०० भाडेतत्वावरील बस दाखल करण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा :- दिवाळीनिमित्त ‘बेस्ट’ योजना

त्यानुसार भाडेतत्त्वावरील ५०० बससाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. आता पहिल्या टप्प्यात ११० बस दाखल होणार आहेत. यापैकी ५० बस रायगड, ५० बस रत्नागिरी आणि ६० बस कोल्हापूर विभागासाठी असतील. यामध्ये चालक कंत्राटदाराचा आणि वाहक एसटीचा असणार आहे. शिवाय डिझेल, बसच्या देखभालीची जबाबदारीही कंत्राटदारावर असणार आहे.

हेही वाचा :- मुंबई महापालिका हेच लक्ष्य, अंधेरी पोटनिवडणुकीकडे दुर्लक्ष – शेखर जोशी

Leave a Reply

Your email address will not be published.