डोंबिवलीत तीन महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२९ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातफे फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. डोंबिवलीतील जन-गन-मन महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तसेच होली एंजल ज्यूनियर कॉलेज, साऊथ इंडियन ज्यूनियर कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला. येथील मॉडेल, होली एंजल्स जुनियर कॉलेज तसेच साऊथ इंडियन विध्यार्थ्यानी बाजी मारली असून विद्यार्थी वर्गात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. मंगळवारी १२ वीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता दिसून येत होती. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होताच उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना समाज माध्यमाद्वारे, दुरध्वनीबरून शुभेच्छा दिल्या. शहरात थोड्याच कालावधीत शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उतविणाऱ्या जान्हवी मल्टी फाऊंडेशनच्या वंदे मातरम् कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. असे संचालक प्राचार्य राजकुमार कोल्हे यांनी सांगितले.

रोशन मिश्र (कला), ज्योती जिश्वास (विज्ञान) आणि अमर गौतम (वाणिज्य) हे विद्यार्थी यशस्वी झाले. तर मॉडेल कॉलेजमधुन एकूण ९१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून ६५१, विज्ञान शाखेतून २१५  तर कला शाखेतून ४०विद्यार्थांनी यश प्राप्त केले आहे अशी माहिती प्राचार्य विनय भोळे यांनी दिली. पेंढारकर कॉलेजचा कला शाखेतून  ७३.३३ टक्के, विज्ञान शाखेतून ७८.२१ टक्के तर वाणिज्य शाखेचा ९६.८८ टक्के निकाल लागला. प्रगती कॉलेजचा एकूण निकाल ९४  टक्के लागल्याचे प्राचार्य महाजन यांनी सांगितले. गेली तेरा वर्षे सतत १०० टक्के निकाल लागण्याची प्रथा यावर्षीही होली एंजल्स जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अबाधित ठेवली आहे. ट्रिनिटी एज्युकेशण ट्रस्ट संचालित संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. उम्मन डेव्हीड व प्राचार्य बिजोय उम्मन यांनी यशस्वी विद्यार्थांचे कौतुक केले. वाणिज्य विभागातून गीतांजली नायर ९२.३१%, नीता साली ९२ %, नीतू पाल ९१.२० गुण मिळाले तर विद्यान शाखेत अस्मिता पाटील ८५.६९%, संघमित्र रंगनाथन ८२.१५ %, रोहित पाटील ८१.३८% गुण मिळते आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email