* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> व्हाईट रिव्हॉलूशनच्या उपक्रमात 100 लिटर दुध जमा – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

व्हाईट रिव्हॉलूशनच्या उपक्रमात 100 लिटर दुध जमा

डोंबिवली दि.२३ :- सांस्कृतिक डोंबिवली शहरात पॉज प्लॅन्ट अँड एनिमल वेल्फेअर सोसायटी संस्थेच्यावतीने महाशिवरात्रीत जे शिवभक्त शंकराच्या पिंडीवर दूध ओतून दर्शन घेतात, पण ते दुध वाया जाऊ नये याकरिता या संस्थेमार्फत गेली पाच वर्षांपासून डोंबिवलीत पूर्व व पश्चिम येथील शिव मंदिरात जाऊन दूध जमा करण्याचे काम करतात. ते दूध फिल्टर करून वृद्धाश्रम, अनाथालयांतील मुलांना, तसेच रस्त्यावरील भटके कुत्रे, मांजरे याना दूध दिले जाते. हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष निलेश भणगे व त्यांच्या टीमने गेली 5 वर्षांपासून सुरू केला आहे. व्हाईट रिव्हॉलूशनच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

हेही वाचा :- राज ठाकरेंना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही – शरद पवार

डोंबिवलीमध्ये पॉज संस्थेच्या कार्यकर्त्यांनी भाविकांकडून तब्बल 100 लीटर दूध जमा केले. जमलेले दूध डोंबिवलीमधील काही संस्थाना व प्राण्यांना देण्यात येणार असे पॉज संस्थेकडून सांगण्यात आले.

सुसंस्कृत व सांस्कृतिक डोंबिवली शहरात पॉज प्लॅन्ट अँड एनिमल वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्यावतीने महाशिवरात्रीत जे शिवभक्त शंकराच्या पिंडीवर दूध ओतून दर्शन घेतात ते दुध वाया जाऊ नये याकरिता या संस्थेमार्फत गेले 5 वर्षांपासून डोंबिवलीत पूर्व व पश्चिम येथील शिव मंदिरात जाऊन दूध जमा करतात.

हेही वाचा :- Kalyan ; शस्त्र बाळगणारा अटकेत

हे दूध फिल्टर करून वृद्धाश्रम, अनाथालय येथील बालकांना आणि रस्त्यावरील भटके कुत्री, मांजरे याना दूध व फळे दिली. हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष निलेश भणगे व त्यांच्या टीमने गेली 5 वर्षांपासून सुरू केला आहे. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केले जात असल्याचे संस्थेचे अध्यक्ष भणगे यांनी सांगितले. शुक्रवारी संस्थेच्या उपक्रम प्रमुख साधना सभरवाल यांच्यासह युनिशिया, ग्लेन आणि आयुष यांनी मंदिरातुन सुमारे 100 लिटर दुध जमा केले. ते फिल्टर आणि गरम करून थंड केल्यानंतर रस्त्यावर फिरुन भटक्या जनावरांना दिले. यंदा या उपक्रमाला शिवभक्तांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे साधना सभरवाल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *