10 व्या अणू ऊर्जा परिषदेचे डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली, दि.२६ – भारताचा अणू ऊर्जा कार्यक्रम हा शांततापूर्ण उदिृष्टांसाठी उपयोगात आणला जाईल हे देशाच्या अणू ऊर्जा कार्यक्रमाचे पितामह डॉ. होमी भाभा यांचे वक्तव्य भारताने यथार्थ ठरवल्याचे केंद्रीय अणू ऊर्जा आणि अंतराळ संशोधन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. 10 व्या अणू ऊर्जा परिषदेचे उद्घाटन करतांना ते आज नवी दिल्लीत बोलत होते. अंतराळ तंत्रज्ञानाचा जनतेसाठी उपयोग करायला प्रोत्साहन देण्यात येत आहे. हेच तत्व अणू ऊर्जा विभागासाठी अंमलात आणले जात आहे.
देशाचा अणू ऊर्जा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी अतिरिक्त निधीची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने 1962 च्या अणू ऊर्जा कायद्यामध्ये सुधारणा केली आहे. यामुळे भारतीय अणू ऊर्जा महामंडळाला इतर भारतीय सार्वजनिक उपक्रमाबरोबर संयुक्त प्रकल्प स्थापन करता येणार आहे. यासह सरकारने यासंदर्भात घेतलेल्या इतर पावलांचीही त्यांनी माहिती दिली.