शुक्रवारी मुख्यमंत्री मीरा भाईंदर येथे
ठाणे – मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पूर्वेकडे बांधलेले प्रमोद महाजन सभागृहासह मीरा रोड पूर्वेकडील रामदेव पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे मार्केट या दोन वास्तूंचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी २ तारखेस सायंकाळी सात वाजता होणार आहे.आयडियल पार्क येथे हा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री ८ वाजता मुख्यमंत्री हे प्रबोधनकार ठाकरे मैदान येथे राजस्थानी होळी महा संमेलनात सहभागी होतील.