विद्यार्थी परिषद आणि एस एफ डी मुम्बईच्या माध्यमातून बिच क्लीन अप एक्टिविटी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि एस एफ डी मुम्बईच्या माध्यमातून कॉलेज विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आज जुहू येथे बिच क्लीन अप एक्टिविटी करण्यात आली.
या वेळी मोठया प्रमाणात निर्माल्य, प्लॅस्टिक पिशव्या, मूर्तींचे अवशेष इ. गोळा करण्यात आले. आपले समुद्र किनारे आपणच स्वच्छ ठेवले पाहिजे ह्या भावनेतून विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते. उत्सव साजरे करणे याच बरोबर पर्यावरण समतोल अतिशय आवश्यक आहे हे जाणवले. अभाविप कोंकण प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ, मुंबई महानगर अध्यक्ष प्रा. डॉ. सोनमनकर सर, SFD मुंबई प्रमुख शंकर गवस आणि विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.