मारहाण करत पान टपरीतील पैसे लुबाडले
डोंबिवली – कल्याण पूर्व सूचक नाका परिसरात मनोज यादव यांचे मंगला पान हाऊस नावाचे दुकान आहे.रविवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास याच परिसरात राहणारा झंका उर्फ इब्राहिम शेख त्यांच्या दुकानात आला .त्याने यादव यांच्याकडे सिगारेट मागितली .यादव त्याला सिगारेट देत असताना त्याने यादव याला लाकडी दंडक्याने मारहाण करन्यास सुरुवात करत त्यांच्या गल्ल्यातील 500 रुपये रोकड हिसकावून घेत टपरीची नासधूस केली .यावेळी भांडणं सोडवण्यासआलेल्या राहुल राठोड याला देखील त्याने मारहाण केली .या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी झंका उर्फ इब्राहिम शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे.