भरदिवसां धूमस्टाईल ने दोन मोबाईल हिसकावले
कल्याण : कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी जेल समोर गणपती चौक विक्की नगर सोसायटी मध्ये राहणारे प्रमोद जाधव काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास रिक्षाने कल्याण रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होते ते सहजानंद चौक येथे पोहचले असतांना पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकी आली दुचाकी वर बसलेल्या इसमाने त्याच्या हातातील खेचून धूम ठोकली दुसरी घटणा मुरबाड रोड वर घडली .उल्हासनगर येथे राहणारे निरज हिरानंदानी काल पावणे चार वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावरून रिक्षाने पोर्णिमा चौक च्या दिशेने येत असतांना मुरबाड रोड येथील ताल हॉटेल जवळ पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकी अली या दुचाकीवर बसलेल्या इसमाने त्याच्या हातातील मोबाईल खेचून क्षणार्धात धूम ठोकली .या दोन्ही प्रकरणी महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.