बालविकास जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित एकदिवसीय विविध दाखले वाटप शिबीर संपन्न
“सरकारी काम सहा महिने थांब” हे वाक्य बदलून आता “घंटो का काम मिंटो में”
बालविकास जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ, कल्याण यांच्यावतीने एकदिवसीय विविध दाखले वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते.दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील प्रवेशासाठी लागणारे कागदपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी होते. नागरिकांना त्रास होऊ नये. “सरकारी काम सहा महिने थांब” हे वाक्य बदलून आता “घंटो का काम मिंटो में” कामगिरी करणारी रचना लावली पाहिजे या अनुषंगाने आणि तहसील कार्यालयाच्या सहकार्याने दाखले निर्मिती कार्य संपन्न झाले. कल्याण पश्चिममधील हजारो नागरिकांनी या शिबिरात सहभागी होत लाभ घेतला. जास्तीत जास्त नागरिकांना जागेवर दाखले वाटप केले तर उर्वरित दाखले घरी पाठवण्याची व्यवस्था केली आहे.
दाखले वाटपवेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. हेमलता नरेंद्र पवार,आमदार नरेन्द्र पवार,नगरसेवक अर्जुन भोईर, भाजयुमो प्रदेश सचिव निखील चव्हाण, ठाणे पालघर विभागीय महासचिव राजाभाऊ पातकर आदी पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.