डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून रूग्णाने केली आत्महत्या
डोंबिवली दि.२१ – एका रुग्णांने शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एम्स रुग्णालयातील चौथ्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून गोकुळ थोरात ( ५० ) असे या रुग्णाचे नाव तो किडनीच्या आजाराचा रुग्णालयात उपचार घेत होता .
कोपर येथे राहणारे गोकुळ थोरात हे अनेक वर्षांपासून किडनी च्या आजाराणे त्रस्त होते. डोंबिवली पुर्वेकडील एम्स रुग्णालयात त्यांची डायलेसीसची ट्रीटमेंट सुरू होती. गुरुवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची स्पंजिंग करून नर्स गेल्या. काही वेळाने पुन्हा इतर रुग्णाचे स्पंजिंग रूम मध्ये आल्या असता त्त्याना थोरात आढळून न आल्याने शोधा शोध सुरू केली असता थोरात यांनी रुग्णालयाच्या खिडकीतून खाली उडी मारून आत्महत्या केल्याचे समजले. दरम्यान गोकुळ यांनी आत्महत्या आजाराच्या त्रासातून केली असल्याचे बोलले जात असले तरी अद्याप कारण अस्पष्ट आहे. मानपाडा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू केली आहे .या सुरक्षिततेच्या दृष्टी कोनातून या रुग्णालयालाच्या खिडक्यांना ग्रील बसवण्याची तसदी रुग्णालय प्रशासनाने घेतली नसून रुग्णांच्या सुरक्षेची जबाबदारी ही रुग्णालायची असल्याने रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जी पणा उघड झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर रुग्णालय प्रशासनाने स्पष्टीकरण देतांना थोरात यांना गुरुवारी सायंकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू होते .पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्याचे इमरजन्सी डायलिसिस देखील डॉक्तरांनी केले. त्यांनतर त्यांच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांना रुग्णाच्या सोबत थांबन्याच्या सूचना डॉकटरणी दिल्या होत्या मात्र नातेवाईकांनी रुग्णाच्या रोजच्या आजाराला कंटाळले असल्याचे सांगून डायलिसिस सम्पल्यावर कोणालाही न सांगता निघून गेल्या. काल सकाळी ६ वाजता नर्सने या रुग्णाचे स्पनजिंग देखील केले त्यानंतर हा रुग्ण जागेवर नाही म्हणून तिने सगळीकडे शोधाशोध केली असता त्याने खिडकीतून उडी मारल्याचे त्यांना आढळले. या घटनेत रुग्णालयाकडून कोणताही हलगर्जीपणा झालेला नसल्याचे स्पष्टीकरण देत हा रुग्ण आजाराला आणि सततच्या डायलिसिसला अतिशय कंटाळलेला होता यामुळेच या सततच्या आजाराला कंटाळून त्याने स्वतःला संपवले असावे असा अंदाज व्यक्त केला. रुग्णालय प्रशासनाकडूनच पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला असून नातेवाईकांनी पोलिसांसमोर आपल्याकडून रुग्णासोबत न राहण्याचा हलगर्जीपणा झाल्याचे मान्य केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मानपाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन काब्दुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितल्याचे स्पष्टीकरण दिले.