कल्याण डोंबिवली गुन्हे वृत्त
बनावट डेबिटकार्डचा वापर करत २० हजारांना गंडा
डोंबिवली : बनावट डेबिट कार्ड च्या आधारे नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे काढण्याच्या घटना वाढल्या असल्याने नागरीकामध्ये भीतीचे वातावरण आहे .त्यातच काळ पुन्हा कल्यातात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे . कल्याण पश्चिमेकडील सिद्धेश्वर आळी मधील श्रीकृष्ण रुक्मिणी सोसायटी मध्ये राहणारे निनाद झारे यांच्या बँक खात्याचे डेबिट कार्ड चे अज्ञात इसमाने क्लोनिंग कार्ड बनवून या बनावट कार्डच्या आधारे त्यांच्या बँक खात्यातून २० हजार रुपये काढून घेतले .हि बाब निदर्शनास आल्याने झारे यांनी या प्रकरणी बाजापेठ पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
भल्या पहाटे लुटीचा प्रयत्न
डोंबिवली : कल्याण डोंबिवली सह आसपासच्या परिसरात भुरट्या चोरट्यांच्या कारवाया वाढल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे .रस्त्यावरून चालणार्या नागरिकांना धमकावून मारहाण करत त्याच्याजवलिल पैसे ,मौल्यवान वस्तू हिसकवून पळ काढण्याच्या घटना वाढल्या असल्याने पोलीसंच धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे .असाच एक प्रकार काल सकळी कल्याण शिवाजी चौका जवळ घडला .डोंबिवली खोणी गाव लोढा येथे राहणारे राकेश कुमार भगत काल सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास भिवंडीला जाण्यासाठी शिवाजी चौकात उभे होते .यावेळी अज्ञात इसमाने त्यांना हटकले व माझ्याकडे काय बघतोस असे बोलत त्यांच्या खिशांतील मोबाईल व पैसे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला मात्र भगत यांनी प्रसंगावधान राखत आरडा ओरड केल्याने या इसमाने त्यांना धक्का देत तेथून पळ काढला .या प्रकरणी भगत यांनी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिला जखमी
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील गणेश नगर येथील स्टार कॉलनी बल्ललेश्वर अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या कुसुम थिटे हि ७३ वर्षीय महिला काल सकाळी दहा वाज्ण्याच्य्या सुमारास लाईट बिल भरण्यासाठी गांधी नगर जकात नाक्या समोरील रोड वरील पायी जात असताना समोरून भरधाव वेगाणे येणार्या दुचाकीने त्यांना धडक दिली या अपघातात थिटे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत .या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाणे गाडी चालवनार्या दुचाकीचालका विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे