७ वर्षीय बलाकावर अत्याचार करुन हत्या
डोंबिवली – एका 7 वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण करून त्याच्यावर लैगिंक अत्याचार करुन त्याची हत्या केल्याची घटना डोंबिवली शहरात घडली आहे.सदर मुलगा २४ तारखेपासून बेपत्ता होता. घरच्यांनी सगळीकडे शोधाशोध केली. पण तो काही सापडला नाही.अखेर घराशेजारी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या गुप्तागांवर गंभीर जखमा होत्या.जे जे रुग्णालयानं दिलेल्या शव विच्छेदन अहवालातून ही बाब समोर आली आहे.दरम्यान सदर मुलावर अत्याचार करणा-यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहरात होत आहे.
Please follow and like us: