७ आगॅॅॅॅष्टला मुंबईत होणा-या ओबीसी महासंघाच्या ३ -या महाअधिवेशनात मोठ्या संख्येने उपस्थित रहा- डॉ. अशोक जीवतोडे”
(म.विजय)
चंद्रपुर – ओबीसी महासंघाव्दारे आयोजित करण्यात आलेल्या प्रत्येक आंदोलन व अधिवेशनानंतर सरकारवर दबावात येवुन ओबीसीच्या हिताचे निर्णय सरकारला घ्यावेच लागले , असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांनी संघटीत होऊन दि. ७ आगष्टला श्री षंण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती आडीटोरीयम, सायन मुबई ईस्ट येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनात चंद्रपुर जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले.
या महाअधिवेशाच्या नियोजनासाठी आज दि.८ जुलैला चंद्रपुर येथिल महाविद्यालयच्या श्रीलीला सभागृहात आयोजित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, बबन फंड, प्रा. संभाजी गारगाटे, प्रा.अशोक पोफळे आदी मान्यवर उपस्थित होते.