६ महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार

इंदूर – चिमुकल्या मुलींसाठी सध्या भयावह स्थिती दिसत आहे. आधीच कथुआ आणि उन्नवमध्ये झालेल्या बलात्कारांमुळे संपूर्ण देश हादरला असताना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका ६ महिन्याच्या चिमुरडीच अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने पुन्हां खळबळ माजली आहे.

त्या चिमुकलीचा मृतदेह राजवाडा भागातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. त्या चिमुकलीच अपहरण करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचं नाव ‘सुनील भील’ असल्याचं समजतंय. सहा महिन्यांच्या चिमुरडीला खांद्यावरुन घेऊन जात असताना सुनील सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस तपास करत आहेत.

सीसीटीव्हीत कैद झालेला आरोपी त्या मुलीच्या कुटुंबीयांना ओळखत होता असं पोलिसांना कळविण्यात आलं आहे. शवविच्छेदनात सुद्धा तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर येत आहे.

Hits: 16

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email