५३ टक्के ध्वज दिन निधी संकलन पूर्ण

५३ टक्के ध्वज दिन निधी संकलन पूर्ण

जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलनासाठी कॉर्पोरेटस, महानगरपालिकांच्या

सहाय्याने विशेष मोहिमा आखाव्यात – जिल्हाधिकारी

ठाणे दि ६: जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलनाचे काम करतांना उद्योग तसेच कॉर्पोरेट संस्था, महानगरपालिका यांची मदत घेण्यात यावी तसेच संकलनासाठी विशेष मोहिमा आयोजित कराव्यात असे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले. ते नियोजन भवन येथे जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे सशस्त्रध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमात बोलत होते. जिल्ह्यात १० हजार माजी सैनिक आणि परिवार आहे. जिल्ह्याने २०१६ या वर्षी  कोटी ६लाखाचे निधी संकलनाचे उद्दिष्ट्य असतांना १ कोटी ४ लाख रुपये इतका म्हणजेच ५३ टक्के निधी जमा केला असून पुढील वर्षीचे उद्दिष्ट्यही आम्ही साध्य करूत असा विश्वास यावेळी बोलतांना जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीमेजर प्रांजळ जाधव यांनी व्यक्त केला. प्रारंभीशहीद जवानांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आपल्या भाषणात ध्वजदिन निधी संकलनाबाबत ठाणे जिल्हा आघाडीवर असून प्रत्येक वर्षी दिलेला इष्टांक टिमवर्कने गोळा करून यातून वीरमाता, वीर पत्नी, तसेच माजी सैनिकांच्या कल्याणासाठी उपयोग केला जातो असे सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले कि, यानिमित्ताने प्रत्येक सैनिकाचे नागरिकाशी नाते जोडले जाणार आहे या भावनेने निधी संकलनाचे काम झाले पाहिजे. मनापा अतिरिक्त आयुक्त  सुनील चव्हाण म्हणाले कि, सामाजिक बांधिलकी म्हणून ध्वज निधी कडे पाहा उद्दिष्ट्य म्हणून पाहू नका.

यावेळी उद्दिष्ट्यपूर्तीसाठी जास्तीत जास्त निधी संकलन करणारे जिल्हा परिषद ठाणे, राज्य उत्पादन शुल्क, सहा जिल्हा मुद्रांक निबंधक, उप विभागीय अधिकारी कार्यालय, कल्याण, तहसीलदार उल्हासनगर, सह जिल्हा निबंधक वर्ग १ ठाणे ग्रामीण, उपनियंत्रक शिधावाटप कार्यालय, मुख्य वन संरक्षक, वन विभाग, जिल्हा पशु संवर्धन, प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण, पोलीस आयुक्त, नवी मुंबई, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे, कल्याण डोंबिवली पालिका या उत्कृष्ट निधी संकलन करणा-या कार्यालयांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी तसेच जिल्हा सैनिक कल्याण निधीतून शिक्षणात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्याचेंही विशेष कौतुक करण्यात येऊन त्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्याचे धनादेश देण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी , अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत कदम,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांची उपस्थिती होती.  

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email