५० हजारात खरेदी केलेल्या पिस्तूलाची ३ लाखात विक्री पिस्तुल विक्रीच्या गोरख धंद्याचा कल्याणमध्ये फर्दाफाश..

कल्याण दि.१९ – कल्याण स्टेशन परिसरात पिस्तुल व कारतुसे विकण्यास आलेल्या शिवरतन यादव सह त्याच्या साथीदार दिनेश कुमार विश्वकर्मा याला महात्मा फुले पोलिसांनी सापळा रचत दोघांना अटक केली. दोघांकडून एक पिस्तुल व २ काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान या दोघांच्या चौकशी दरम्यान पिस्तुल ५० हजारात खरेदी केली जाते आणि २ लाखाहून अधिक किमतीत ही पिस्तुल विकली जाते आणि जो इसम ग्राहक शोधून देतो त्याला ४० हजार दिले जात असल्याचे उघड झाले असून पिस्तुल विक्री चा हा गोरख धंदा किती दिवसांपासून सुरू आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परीसारतील एक इसम पिस्तुल व कारतुसे विकण्यास येणार असल्याची महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डांबरे यांच्या पथकाने याच्या पथकाने कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचत शिवरतन यादव याला एक पिस्तुल व कारतुससह अटक केली.

त्याने हे पिस्तुल ठाणे येथे राहणाऱ्या दिनेश कुमार विश्वकर्मा याच्याकडून आणल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसानी दिनेश विश्वकर्मा याला अटक केली या दोघांच्या चौकशी दरम्यन हे ही पिस्तुल उत्तरप्रदेश येथून ५० हजारात खरेदी केली होती आणि ती मुंबईत आणून ३ लाखात विकणार होता त्यासाठी ते ग्राहक शोधत होता. त्यासाठी त्याने शिवरतन ला ४० हजार रुपये देण्याचे ठरवले होते. आता ही पिस्तुल कुठून आणली? आणि अशा प्रकारे किती लोकांना विकली याचा तपास पोलीस करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email