५०० रुपये मागितले म्हणून डोंबिवलीतील भंगारविक्रेता हत्या झाल्याचे उघडकीस
डोंबिवली दि.१४ – दीपकचव्हाण या भंगार विक्रेत्याचा मृतदेह हातगाडीवर आढळून आल्याने डोंबिवलीत एकच खळबळ उडाली होती. दीपकची हत्या करणाऱ्या बादशाह शेख या तरुणाला बेड्या ठोकल्या असून दीपकने त्याच्याकडे ५०० रुपये मागितले. बादशहाने नकार दिल्याने दोघामध्ये वाद झाला. या वादातून बादशहाने दीपकची हत्या केल्याचे निष्पन्न झाले.
शनिवार सायंकाळ पासून बेपत्ता असलेल्या दीपक चौहान या भंगार विक्रेता तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी डोंबिवली औद्योगिक परिसरातील नेकणीपाडा येथिल बस स्टँड मागील रस्त्यावर हातगाडीवर आढळून आला. या तरुणाची हत्या करण्यात आल्याचे उघड झाल्याने डोंबिवली मध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीपकची हत्या कोणी व कोणत्या कारणासाठी केला याचा तपास मानपाडा पोलीस करीत होते.
दीपकने धारदार शस्त्राने दीपक वर करत त्याची हत्या करून त्याचा मृतदेह एका मोठ्या प्लास्टिकच्या गोणीत भरून भंगार जमा करण्याच्या गाडीवर ठेवण्यात आला होता. याच दरम्यान पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता बादहशहा या दिपकच्या मित्राने त्याची हत्या करण्यात आल्याचे उघड झाल्याने मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दीपकनी आरोपी कडून ५०० रुपये मागीतले होते. मात्र बादशहाने नकार दिल्याने या दोघांमध्ये वाद झाला याच वादातून बादशहा ने दीपकची हत्या केली असल्याचे तपासा दरम्यान समोर आले आहे.