३ व ४ फेब्रुवारी रोजी भव्य राज्यस्तरीय गुलाब पुष्प प्रदर्शनाचे आयोजन
(श्रीराम कांदु)
डोंबिवली-येथील डोंबिवलीकर मासिकाच्या विद्द्यमाने येत्या ३ व ४ फेब्रुवारी रोजी आनंद बालभवन येथे भव्य राज्यस्तरीय गुलाब पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून यासह आकर्षक पुष्परचना सजावट आयोजित करण्यात आली आहे.
३ तारखेला सकाळी १० वाजता हे प्रदर्शन सुरु होणार असून यामध्ये २५० प्रकारचे गुलाब पहाण्यास मिळनार आहेत.इंडियन रोझ फेडरेशनच्या विद्द्यामाने गुलाबाची शेती करणा-या व्यक्ती व संस्था यामधे सहभागी होणार असून डॉ.म्हसकर व वांगणीचे मोरे बंधू यांना ख़ास आमंत्रित करण्यात आले आहे.बालभवन येथे सकाळी १० ते रात्री १० पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून या विनामूल्य प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभुकापसे यांनी केले आहे.
Please follow and like us: