२७ गावात घर घेणा-यानो सावधान ! कधीही मनपा करू शकते बेघर

(राजेश सिन्हा )
कल्याण – डोंबिवली मनपातुन दशकभर वेगळे राहिल्यानंतर, मनपात सामिल झालेल्या २७ गावात  घर खरेदी करायची ईच्छा करणा-या नागरिकांसाठी एक वाईट बातमी आहे. या२७ गावात बनणा-या  बहुसंख्य इमारतीना के डी एम सी च्या नगररचना विभागाची मंज़ूरी नसल्याने या इमारतींवर केव्हाही मनपाच्या कारवाईचा हातोडा पडू शकतो.
मनपाच्या नगररचना विभागाच्या सूत्रांचे सांगणे मानल्यास २७ गावात बनणा-या गगन चुम्बी इमारतींच्या चटई क्षेत्राला घेवुन गोंधळाची स्थिति आहे.सद्ध्या या २७ गावात मोठया प्रमाणात ईमारती बनत असून त्याना जिल्हाधिकारी कर्यालायाकडून मंजुरी मिळत असल्याचा दावा बिल्डर्स करतात.परंतु हकिगत अशी आहे की मनपात सामिल झाल्यानंतर इमारतीना के डी एम सी च्या नगररचना विभागाची मंजुरी घेणे गरजेचे आहे. मनपाच्या बनणा-या  इमारतीना मनपा अवैध मानते.

२७ गावातील निळजे,कोळे,काटई,मानापाडा,नांदीवली,सोनारपाडा,गोळवली,दावडी,पिसवली,द्वारली याच बरोबर सर्वच ठिकाणी मोठया प्रमाणात अवैध निर्माण होत असून बिल्डर व दलाल यांनी दिलेल्या प्रलोभनाला बळी पडण्यापूर्वी बनत असणा-या इमारतीची कागतपत्र घर विकत घेवु ईच्छिणा-यांनी तपासणे गरजेचे आहे.कागतप्रत्राची मागणी केली पाहिजे.बिल्डर्सनी काही खाजगी बँका धरून ठेवल्या आहेत.जेथून सहजपणे गृहकर्ज मिळते.परन्तु घर घेणा-यानी सरकारी बँकेत ही कागतप्रत्र दाखवली पाहिजेत व तेथून कर्ज मिळते का याचीही खात्री केली पाहिजे.त्यांना इथे ईमारत वैध असण्यासंदर्भात माहिती मिळु शकते.याशिवाय आपल्या विश्वासातील वकिलाकडूनही सदर कगतपत्रे तपासून घेता येवू शकतात.

२७ गावात पालिका अधिकारी या प्रकारच्या बांधकामांद्वारे भरपूर पैसे कमावत असल्याचा आरोपही शहरात होत आहे.इथले बिल्डर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रमाण फार कमी आहे.अधिका-यांचे दुर्लक्ष अथवा भ्रष्टाचार यातून बिल्डर्सचे मनोबलही एव्हढे वाढले आहे की घर घेण्यापूर्वी अनेकदा बिल्डर मोठमोठया प्रलोभान्नांसह बांधकाम अनधिकृत असल्याचिही माहिती देतात. अधिका-यांच्या सौजन्याशिवाय या ईमारती उभ्या राहतील का?अधिका-यांना पैशांच्या जोरावर गप्प केले असल्याने तुमच्या घराला काहीही होणार नाही अशी खात्रीही देतात.

ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त संजीव जैसवाल यांनी ठाणे महापालिका क्षेत्रात ज्याप्रमाणे अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहिम उघडली आहे.तसे  आयुक्त कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत आयुक्त म्हणून  आल्यास होणा-या कारवाईत २७ गावात घर घेणा-या कित्येक परिवारांवर बेघर होण्याची वेळ येवू शकते हे विसरून चालणार नाही.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email