२४ तारखे पासुन मुंब्रा बायपास दुरुस्ती साठी दोन महीने बंद

ठाणे :- रेल्वे उड्डाण पुलाचे मजबुतीकरण करणे , बेअरिंग बदलणे व काही लांबीतील डेकस्लँब तोडून नव्याने बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल सुरू करणार असल्याने मुंब्रा बायपास रस्त्यावरील वाहतूक दिनांक 24 एप्रिल 2018 पासुन दोन महीने बंद राहणार आहे , त्यामुळे दोन महीने ट्रँफिकची कोंडी वाढण्याची शक्यता आहे , यावर उपाय म्हणून उपायुक्त अमित काळे यांनी वाहतूकीला पर्यायी व्यवस्था केली आहे.
जेएनपीटी नवी मुंबई येथुन निघणाऱ्या जडअवजड वाहनांना पळस्पे फाटा मार्गे जुन्या मुंबई पुणे रोडने कर्जत मुरबाड किन्हवलि शहापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरून नाशिक अथवा नाशिकच्या दिशेने 24 तास पूर्णवेळ सोडण्यात येणार आहे , जेएनपीटी नवी मुंबई येथुन भिवंडीला जाणारे जडअवजड वाहने फक्त रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कळंबोली सर्कल तळोजा कल्याण फाटा , कल्याण शीळ रोडने काटाई पत्रीपुल कल्याण दुर्गाडी कोनगाव रांजनोली नाक्यावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरून फक्त भिवंडीच्या दिशेने जातील , त्याच प्रमाणे जेएनपीटी नवी मुंबई कडून उरणफाटा मार्गे म्हापे सर्कल कडुन शीळफाटा मार्गे येण्यास पूर्ण पणे मनाई करण्यात आली आहे , ह्या वाहानांना रात्री 11 ते सकाळी 5 पर्यँत म्हापे सर्कल येथुन रबाले एमआयडीसी एेरोली पटणी , मुलुंड एरोली ब्रिज वरून एेरोली टोल नाका मार्गे मुलुंड आनंद टोल नाकामार्गे घोडबंदर रोडने गुजरातच्या दिशेने सोडण्यात येईल , तसेच फक्त घोडबंदर रोडने गुजरात कडून नवी मुंबई जेएनपीटी कडे जाणाऱ्या व जेएनपीटी कडुन गुजरात कडे जाणाऱ्या जड अवजड वाहानांना दुपारी 12 ते 4 या वेळे पर्यंत नियंत्रित पध्द्तीने आनंदनगर चेकनाका मार्गे जेएनपीटी / गुजरात कडे सोडण्यात येईल , अग्नीशमन दल , पोलीस , रुग्णवाहीक व अत्यावश्यक सेवेतील वाहाने ही मुंब्रा बायपास ऐवजी जुना पुणे मुंबईरोड राष्ट्रीय महामार्ग 4 या मार्गाने जातील , कल्याण फाटा व मुंब्रा रेतिबंदर येथुन दुचाकी , तिनचाकी , चार चाकी व इतर हलकी वहाने मुंब्रा शहरातुन जुन्या पुणे मुंबई रोडने येजा करतील , तसेच मुंब्रा शहरामधे जीवनावश्यक माल वाहातुक करणाऱ्या वाहनांना रात्री 12 वाजता ते पहाटे 5 वाजे पर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे ,जेएनपीटी येथुन निघणाऱ्या जड अवजड कंटेनर यांना टोकन देण्यात येणार आहे , त्यावर गाडीचा नंबर व निघण्याची वेळ नमूद करण्यात येणार आहे , या अधीसुचनेचा भंग करणाऱ्या मोटर वाहन चालका विरुद्ध मोटर वाहन कायदा 1988 कलम 179(1) अन्वये कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे उपायुक्त अमित काळे यांनी सांगीतले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email