२०२२ ते २०२५ या दरम्यान मुंबईचा कायापालट होणार ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी मुंबई – नवी मुंबई विमानतळावरून २०२२ नंतर विमान उड्डाण सुरू होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई येथे व्यक्त केला. २०२२पर्यंत नवी मुंबईचं चित्र पालटणार असून हवाई वाहतूक, रस्ते वाहतुकीत मोठे बदल झालेले दिसणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करण्यात आले.तसेच जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. २०२२ ते २०२५ या दरम्यान मुंबईचा कायापालट होईल. नवी मुंबईतून विमाने उडू लागतील, तसेच २२ किलोमीटर लांबीच्या ट्रान्स हार्बर लिंकवरून गाड्या धावतील,मुंबईतील डबल लाइन सबर्बन कॉरिडॉरचे काम वेगाने पूर्ण होईल, समुद्र, जमीन, रेल्वे यांच्याशी संबंधित सर्व प्रकल्प या काळात पूर्ण होतील आणि अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारकही दिमाखात उभं राहिलेलं दिसेल मुंबईचं संपूर्ण चित्रच पलटून कायापालट होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.