२०१४-१७  या तीन वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अर्ज करण्यास मुदतवाढ

(श्री राम कांदु )

ठाणे :दि. ३०   २०१४-१५ ,२०१५-१६,२०१६-१७ या तीन वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारा करीता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ३० नोव्हेंबर अशी होती. सदरची मुदत ९ डिसेंबर पर्यंत वाढवण्यात येत आहे. सादर अर्जासोबत १०० प्रमाणपत्रांची मर्यादा रद्द करून अर्जदाराने सादर केलेल्या सर्व प्रमाणपत्रे अपलोड करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाड यांनी सांगितले आहे.

 महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित असुन यामध्ये राज्यातील सर्वोत्क्रुष्ट कार्य करणा-या खेळाडु,दिव्यांग खेळाडु, क्रीडा संघटक /कार्यकर्ता,उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक व महिला क्रीडा मार्गदर्शक/ संघटक/ कार्यकर्ती यांच्यासाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार तसेच ज्येष्ठ क्रीडा महर्षी शिवछत्रपती राज्य जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

.  सन २०१४-१५ , २०१५-१६, २०१६-१७ या वर्षासाठी मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या – त्या आंतरराष्ट्रीय/ राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ तसेच वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडु, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडुंसह क्रीडा संघटक / कार्यकर्ता, उत्क्रुष्ट क्रीडा मार्गदर्शक व महिला क्रीडा मार्गदर्शक/ संघटक / कार्यकर्ती यांचे विहीत नमुन्यातील अर्ज संबधित राज्य संघटनेच्या कार्यकारणीच्या ठरावासह दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत अर्जदाराने आपल्या कामगीरीचा तपशील देऊन विहीत नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.mumbaidivisionsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावा . तर ऑनलाईन अर्जाची एक प्रत अर्जदाराने संबधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे येथे ११ डिसेंबर पुर्वी स्वयंसाक्षांकीत प्रमाणपत्रांसह सादर करावे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email