२०० आणि ५० च्या नोटा चक्क काळ्या बाजारात!

२०० आणि ५० च्या नोटा चक्क काळ्या बाजारात

( श्रीराम कांदु )

नव्या ५० आणि २०० रुपयांच्या नोटांचे दर्शन आपल्याला तरी अजुनही दुर्मिळ आहे. त्यामुळेच असेल कदाचित या नोटा चक्क काळ्या बाजारात विकल्या जात आहेत. दिवाळी आणि लग्नाच्या मोसमात तर या ब्लॅक मार्केटला आणखी तेजी आली आहे. २०० रुपयांच्या नव्या नोटांच्या २० हजारांच्या बंडलसाठी १५०० ते १७०० रुपये जास्त घेतले जात आहेत, तर ५० च्या नव्या नोटांसाठी ५०० रुपये जादा घेतले जात आहेत.१ रुपयाची नोट भलेही जुनी असेल, पण तिलाही मागणी आहे. एक रुपयाच्या १०० नोटांचं बंडल ६५० रुपये जास्त देऊन घेतले जात आहे. जे जुन्या-फाटलेल्या नोटा बदलून देतात, त्यांच्याकडे या नव्या नोटा ब्लॅकने मिळतात. दिल्लीच्या सदर बाजार, चांदनी चौक, खारी बावली, फतेहपुरी, जुन्या रेल्वे स्थानकासमोर आदि अनेक ठिकाणी या नोटा देणारे लोक बसलेले असतात.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email