१ मे रोजी पनवेल येथे पर्यावरण कार्यशाळा आयोजित
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माद्यामातुं मंगळवार, दि. १ मे २०१८ रोजी पनवेल येथे पर्यावरण विषयक एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी Field visit (प्रत्यक्ष प्रकल्प पाहणी) चे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा विनामुल्य आहे
परिषदेच्या माध्यमातून ‘विकासार्थ विद्यार्थी’ (SFD) या आयाम द्वारे जन, जल, जंगल, जमीन, जानवर ह्या सर्वांचा विचार करून अर्थात, ‘संतुलित विकास’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम घेतले जातात.”श्वास’ आणि ‘नदी वाहते’ ह्या सिनेमाचे प्रसिद्ध दिग्दर्शक संदिप सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. तसेच ‘नर्मदा स्वच्छता अभियान’ चे सचिन दवे (भोपाळ) आणि पर्यावरण दक्षता मंचच्या श्रीमती. संगीता जोशी (ठाणे) ह्यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.महाविद्यालयीन विद्यार्थी / विद्यार्थिनी आणि प्राध्यापक यात सहभागी होऊ शकतात.यात विध्यार्थ्यानी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य मिहिर देसाई यांनी केले आहे.
सहभागी होण्यासाठी हा गुगल फॉर्म भारणे आवश्यक आहे.
Registration Form –
https://goo.gl/forms/Mmj5lJUnvlpKCFkI3
संपर्क –
9975096010
sfdkonkan1@gmail.com
Mihir Desai
Student for Development, Konkan