१ जुलै जीएसटी दिनाचे ठाणे,नवी मुंबईत कार्यक्रम,वस्तू व सेवा कराविषयीचे गैरसमज दूर करणार

,करदात्यांचा सन्मानही आयोजित

ठाणे दि ३० – वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी होऊन आता एक वर्ष पूर्ण होत असून १ जुलै रोजी वस्तू व सेवाकर विभाग ठाणे यांच्या वतीने सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे ठाणे परिक्षेत्राचे अपर राज्यकर आयुक्त सुमेरकुमार काळे यांनी कळविले आहे. हा कार्यक्रम वस्तू व सेवा कर कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे पश्चिम येथे होईल.

सुमेरकुमार काळे नुकतेच ठाणे येथे बढती होऊन दादासाहेब मांढरे यांच्या जागी रुजू झाले असून ते पूर्वी पुणे येथे सह राज्य कर आयुक्त होते.

हा कायदा अंमलात आल्यानंतर राज्याच्या तिजोरीत २८.०७ टक्के वृद्धी झाली आहे आणि त्यामुळेच प्रतिकात्मकरित्या काही करदात्यांचा १ जुलै रोजी सन्मानही करण्यात येणारा आहे असे त्यांनी सांगितले.

राज्य कर सहआयुक्त ठाणे शिवाजीराव केनवडेकर हे देखील उपस्थित राहणार असून विविध विषयांवर काही मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email