(श्रीराम कांदु)
डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात आगरी युथ फोरम डोंबिवलीच्या वतीने होणाऱ्या १५ व्या अखिल भारतीय आगरी महोत्सव यंदा १४३ देशात खाजगी वाह्नीच्या माध्यमातून दिसणार असल्याची माहिती अध्यक्ष गुलाब वझे दिली. आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कला दिग्दर्शक संजय धबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आगरी-केरळी संस्कृती दर्शनाची आकर्षक कलाकृती व्यासपीठावर साकारणार आहे. राज्याचे शैक्षणिक-सांस्कृतीस मंत्री विनोद तावडे आज फित कापून महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.
संमेलनात ६० फूट लांब व ४० फूट रुंद एवढय़ा आकाराचे भव्य व्यासपीठ विस्तीर्ण मैदानावर भव्य लांब–रुंद सभामंडपाची रचना करण्यात आली असून त्यामधील प्रवेशद्वार ६० फुट लाबीचे आहे. सुमारे १५० स्टॉल उभारण्यात आले असून त्या स्टॉलच्या माध्यमातून आगरी व केरळी संस्कुतीचे खाद्य पदार्थांचा स्वाद तसेच नाविन्यपूर्ण विविध वस्तूंची खरेदी करता येणार आहे. पंधराव्या“आगरी महोत्सव’ या कार्यक्रमा अंतर्गत होणाऱ्या “ महाराष्ट्र केरळ संस्कृती दर्शन “ या पश्चिम किनारपट्टीवरील महाराष्ट्र व केरळ या दोन आपआपली आगळीवेगळी भिन्न संस्कृती व परंपरा जतन करणाऱ्या राज्यांच्या संस्कृती मिलाप व आदान प्रदान कार्यक्रमाने पडणार आहे. दररोज नऊ दिवस चालणारा सोहळा म्हणजे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील रसिकांसाठी एकाच ठिकाणी महाराष्ट्र व केरळ राज्यांच्या संस्कृती व परंपरेची अनुभुती देणारा देशात प्रथमच आयोजित होणारा सोहळा ठरणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उद्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह खा.कपिल पाटील,ना.एकनाथ शिंदे,ना.रविंद्र चव्हाण तसेच राज्य पुरस्कार विजेती अभिनेत्री शीला,अभिनेता मधु,दिग्दर्शक अडूर गोपालकृष्ण,सुर्य कृष्णमूर्ती,एस.जी.श्रीकुमार यांच्या उपस्थितीत राहणार आहेत.
Please follow and like us: