१३२  कुटुंबांचा महापालिकेवर मोर्चा,फसवणूक केलेल्या बिल्डरवर कारवाईची मागणी 

श्रीराम कांदु 

डोंबिवली  : बांधकाम व्यवसायिकाने सोयासायटीच्या काही भागासह रस्त्यावर अतिक्रमन केले,तसेच इतर सुविधा बाबत आश्वसन देऊन ही बिल्डरने सुविधा न देता बिल्डर ने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे .याबाबत या सोसायटीच्या  रहिवाशांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कारवाई न केल्याने आज संतप्त रहिवाशांनी महापालिका मुख्यालयावर धडक देत संबंधित विकासकावर कारवाई ची मागणी केली .यावेळी प्रशासनाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेत याबाबत बिल्डर ने तुम्हाला आश्वसित केलेली कामे पूर्ण करून देत नाही तोपर्यंत त्याला कामाची परवानगी देणार नाही तसेच तीन वाजेपर्यंत काम थांबवू असे आश्वासन दिले .

कल्याण पश्चिमेकडील  ” मातृ अमी हौसिंग सोसायटी” ची १३२ कुटुंबे गेली अनेक वर्षपासून राहतात .सदर इमारतीच्या विकासकाने रहिवाशाना  रस्त्याचे बांधकाम ,सोलर सीस्टम,व्हाटर हार्वेस्टिंग,व्हॉल कंपाउंड  बांधून देतो असे आश्वसन दिले होते मात्र बिल्डरने या सुविधा दिल्या नाहीत तसेच फायर ऑडिट हि चूकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे .याबाबत येथिल रहिवाशांनी  ” मातृ अमी सोसायटीचे ” विकासक मे.अमिशा शेल्टर्स चे भागीदार गिरीश शाह यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेकडे सदरच्या इमारतीचे प्लॅन सुपूर्द करताना मुख्य रस्त्यापासून एक ६० फूट रुंदीचा रस्ता व नाल्यावर ब्रिज बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. सोसायटीला खेटुन असलेला आरक्षित भूखंडावर एका शाळेचे काम सुरु असुन त्यांनी आमच्या सोसायटीतील काही भाग व आमच्या प्रस्तावित रस्त्यावर अवैधरीत्या कब्जा केला आहे. आग लागण्यासारखी एखादी घटना घडली तर अग्निशमन दलाचे बंब आणि इतर गाड्या आत येवुच शकणार नाहीत त्यामुळे आम्हांला आपला जीव मुठीत घेउन दिवस काढावे लागत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे .अमिषा शेल्टर्स यांनी पालिके कडून ओसी  आणि सीसी सर्टिफिकेट कसे मिळविले ? सोसायटीचे काम अपूर्ण असताना समोरच्या शाळेला एन ओ सी कशी दिली?असा सवाल उपस्थित केला याबाबत रहिवाशनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र प्रशासनाने त्याला काम  थांबविण्यासाठी नोटीस देणे या पलीकडे कोणतीही कारवाई झालेली नाही. निर्ढावलेले विकासक पालिकेच्या नोटीसला सरळ केराची टोपली दाखवून काम सुरूच ठेवतात. यामुळे कायदा आणि प्रशासन यांच्यावरील आमचा विश्वास उडाला असलयाचा आरोप।करतसोसायटीतील सर्व १३२ कुटुंबे आपल्या लहान मुलांना सोबत घेउन पालिका मुख्यलयावर धडक दिली यावेळी पालिका प्रशासनाकडे त्यांनी न्याय देण्याची मागणी केली यावेळी पालिका अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनी हि बाब निदर्शनास आणून देत कारवाईची मागणी केली .अतिरिक्त आयुक्त सहाययक संचालक नगर रचनाकार मारुती राठोड ,कल्याण नगर रचनाकार संजय भोळे यांची भेट घेतली असता त्यांनी बिल्डर ने तुम्हाला आश्वसित केलेली कामे पूर्ण करून देत नाही तोपर्यंत त्याला कामाची परवानगी देणार नाही तसेच तीन वाजेपर्यंत काम थांबवू असे आश्वासन दिल्याचे रहिवाशांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email