१० थर लावणा-या पथकाला २१ लाखचे बक्षिस – मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव
ठाणे दि.२१ – गोविंदांचा सराव जोर धरू लागला आहे. दुसरीकडे आयोजकही तयारीला लागले आहेत. गेल्या वर्षी १० थरांना ११ लाखांचे पारितोषिक ठेवणाऱया मनसेने यंदा आपल्या बक्षिसाची रक्कम चांगली वाढवली आहे. मन ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवसे आयोजित यंदाच्या दहीहंडीत १० थरांचे मनोरे रचणाºया मंडळाला तब्बल २१ लाख रुपये रोख देण्याचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे यंदाची दहीहंडी कोण फोडणार? १० थर लागणार का, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. आपल्या दहीहंडी उत्सवात १० थर लावणा-या पथकाला मनसे ठाणे शहर २१ लाख रुपये रोख, तर नऊ थर लावणा-या पथकाला ११ लाख रुपये रोख देणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. गेल्या वर्षी मनसे ठाणे शहर आयोजित दहीहंडी उत्सवात १० थर लावणा-या पथकाला ११ लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर केले होते.
यावेळी बोरिवलीच्या शिवसाई गोविंदा पथकापाठोपाठ जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी दिली होती. परंतु, शिवसाई गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात नऊ थरांची सलामी देऊन विश्वविक्रमाची बरोबरी केली होती, तर जयजवान गोविंदा पथकाचा दोनदा १० थर लावण्याचा प्रयत्न फसला होता. तिसºयांदा मात्र त्यांनी नऊ थर लावून सलामी दिली होती. त्यामुळे दोघांना ११ लाखांचे बक्षीस विभागून देण्यात आले होते. याचवेळी बोरिवलीच्या बाळ मित्र मंडळाने साडेआठ थर लावले होते. यंदा ते नऊ थर लावणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले. गेली दोन वर्षे शिवसाई आणि जयजवान या गोविंदा पथकांनी मनसेच्या दहीहंडी उत्सवात नऊ थर रचले होते. यंदा या उत्सवाचे तिसरे वर्ष आहे. त्यामुळे १० थरांची दहीहंडी फोडून २१ लाखांचे पारितोषिक कोण पटकावणार, याची चर्चा रंगली आहे.