१०० पुरुषांनी बायका जिवंत असतानाच श्राध्द

नाशिक – संसारामध्ये सतत उडणार्‍या खटक्यांना कंटाळून पत्नी जिवंत असताना १०० पतींनी त्यांचे श्राद्ध घातल्याची घटना नाशिकमध्ये घडली. समाजातील या अनोख्या प्रकाराची सर्वत्र चर्चा रंगली आहे. विवाहित पुरुषांवर पत्नीकडून होणार्‍या अत्याचाराविरोधात काम करणार्‍या वास्तव फाऊंडेशनच्या पुढाकाराने हा श्राद्ध विधी पूर्ण करण्यात आला.

विवाहित पुरुषांच्या हक्कासाठी ४ वर्षांपूर्वी वास्तव फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. याच फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यभरातील पीडित पुरुषांनी गोदावरी नदीतील रामकुंड परिसरात चक्क जिवंतपणी पत्नीचे श्राद्ध घातले. अग्निदेवाला साक्षी मानत वेदमंत्रांच्या उच्चारात हा विधी पार पडला. विवाहित पुरुषांना घरात होणार्‍या अत्याचारापासून मुक्ती मिळावी, समाजाला पुरुषांवर होणार्‍या कौटुंबीक छळाची जाणीव व्हावी, सुखशांती मिळावी, अशी मनोकामना यावेळी पुरुषांनी केली. अनोखा श्राद्ध विधी बघण्यासाठी गोदाघाट परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.