हॉटेल मध्ये गर्दी असल्याने थांबण्यास सांगितल्याने चार जणांनी केली हॉटेल मालाकला मारहाण
डोंबीवली- हॉटेल मध्ये गर्दी असल्याने थोडा वेळ थांबा असे सांगितल्याने संतापलेल्या चार तरुणानि हॉटेल मालकाला शिवीगाळ व मारहाण करत खिशातील २ हजार रुपये काढून घेत हॉटेल बंद करण्याची धमकी देत तेथून पळ काढल्याची घटना डोंबिवली खंबाळपाडा येथे घडली या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात राहुल शेलार ,सुजित,राहुल व त्याच्या मित्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कल्याण पूर्वेकडील राजाराम नगर मध्ये राहणारे सचिन चव्हाण यांचे डोंबिवली पूर्वेकडील कांचन गाव येथे नक्षत्र हॉटेल आहे .काल सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास याच परिसरात राहणारे राहुल शेलार ,सुजित,राहुल व त्याच्या मित्र या हॉटेल मध्ये आले मात्र हॉटेल मध्ये गर्दी असल्याने बसण्यास जागा नव्हती म्हणून हॉटेल मालक सचिन यांनी त्यांना थोड्या वेळ बाहेर थांबण्यास सांगितले .त्यामुळे संतापलेल्या या चौघांनी सचिन यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली .तसेच सचिन यांच्या खिशातील २ हजार रुपये रोकड काढून घेत हॉटेल बंद करण्याची धमकी देत तेथून निघून गेले .या प्रकरणी सचिन चव्हाण यांनी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी राहुल शेलार ,सुजित,राहुल व त्याच्या मित्रा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us: