हॅपी स्ट्रीट कार्यक्रमामुळे ठाण्यातील वाहतूक नियंत्रण
(श्रीराम कांदु)
ठाणे दि.२४ : ठाणे शहरातील नागरिकांकरिता टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपच्या वतीने गॅल्डी अल्वारीस रोडवर २६ नोव्हेंबर ते ११ फेब्रुवारी या दरम्यान दर रविवारी हॅपी स्ट्रीट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे . या कार्यक्रमात मोठ्या संख्येत नागरिक सहभागी होणार असल्याने या परिसरातील वाहतूक सुनिश्चित होण्यासाठी पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे आहेत
हिरानंदानी मिडॉस, पवारनगर, लोक हॉस्पिटल व इतर भागातून टिकुजीनीवाडी- मानपाडा बाजूकडे जाणाऱ्या लोक हॉस्पिटल चौक ते हैप्पी व्हली चौक दरम्यान जाणाऱ्या वाहिनीवर सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग-: सदरची वाहने हिरानंदानी मिडॉस, पवारनगर, वसंत विहार सर्कल कडून डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह चौक ते हॅपी व्हेली मार्गे टिकुजीनीवाडी-मानपाडा बाजूकडून येणाऱ्या एकाच वाहिनीवरून जातील.लोक हॉस्पिटल चौक ते हैप्पी व्हली चौक या दरम्यान रस्त्याचे दोन्ही बाजूस सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मनाईकरण्यात येत आहे.
हि वाहतूक अधिसूचना २६ नोव्हेंबर ते ११फेब्रुवारी २०१८ रोजी दरम्यानच्या दर रविवारी सकाळी ५ ते ११ वाजे पर्यंत लागू राहील . पोलीस वाहने, रुग्णवाहिका,फायरब्रिगेड व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू नाही असे पोलीस उप आयुक्त ,शहर वाहतूक शाखा अमित काळे कळविले आहे.