हृदयविकाराच्या दोन झटक्यांनंतरही ६५ वर्षीय रुग्णाचे प्राण वाचवले

दोन ब्लॉकेजेस असूनही ईसीजी सामान्यच होतायाला स्टटरिंग हार्ट अटॅक‘ असे म्हणतात

डोंबिवली – कल्याण येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय ओम प्रकाश पांडे यांनी अँजिओप्लास्टीनंतर जणू नवे आयुष्यच मिळाले. दोनदा ईजीसी काढूनही हृदयविकाराच्या झटक्याची कोणतीही लक्षणे त्यात दिसत नव्हती. मात्र, दोनदा इजीसी काढल्यानंतर रुग्णाला अँजिओग्राफी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यात खरे कळले की या रुग्णाच्या हृदयात दोन ब्लॉकेजेस (एक ९९ टक्के तर दुसरा ९० टक्के) आहेत. त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली.

त्यांना सकाळी ७ वाजता छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण, तिथे पोहोचेपर्यंत त्यांचे दुखणे पूर्णपणे थांबून त्यांना बरे वाटू लागले होते. रुग्णालयातील ईआरमध्ये त्यांचा ईसीजी काढण्यात आला. तो अगदी सामान्य होता. त्यानंतर २डी- इको ही चाचणी करण्यात आली. त्यानंतर तासाभराच्या निरिक्षण आणि औषधोपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, पाच तासांनी त्यांनी पुन्हा तसेच दुखू लागले. त्यांना पुन्हा रुग्णालयात आणले गेले, पुन्हा ईसीजी काढला… पण, त्यात काहीच बदल नव्हता. ईसीजी पूर्वीप्रमाणेच होता. मात्र, यावेळी २ डी इकोमध्ये काही प्रमाणात अबनॉर्मलिटीज दिसत होती.

या नव्या निष्कर्षांमुळे रुग्णाला कोरोनरी अँजिओग्राफी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांच्या अँजिओग्राममध्ये हृदयाची मुख्य धमनी (एलएडी) बंद पडल्याचे (९९ टक्के बंद) दिसत होते. त्यातून अपुरा आणि अनियमित रक्तपुरवठा होत होता. त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली.

या परिस्थितीला ‘स्टटरिंग हार्ट अटॅक’ असे म्हणतात. हृदयाला रक्त पुरवठा करणारी धमनी अनियमित कार्य करू लागली की हा त्रास उद्भवतो. एकीकडे ही धमनी गुठळ्यांमुळे पूर्णपणे बंद पडली होती आणि त्यामुळे ह्दयाला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होऊ शकत नव्हता. तर दुसरीकडे, ही गुठळी मध्येच बाजूला सरकून हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्याला बारीकशी वाट करून देत होती.

 ओम प्रकाश म्हणाले, “मला फक्त १०-१५ मिनिटेच छातीत दुखले. त्यामुळे, रुग्णालयात पोहोचपर्यंत दुखणे थांबले होते. त्यामुळे, आपल्याला काही गंभीर झाले आहे, असे मला वाटलेच नाही. सुदैवाने, डी. पंडियन यांनी तातडीने अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच, ब्लॉकेजची स्थिती गंभीर आहे आणि अँजिओप्लास्टीची आवश्यकता आहे, हे आम्हाला कळू शकले.”

एसआरव्ही ममता हॉस्पिटलचे ज्येष्ठ कार्डिऑलिजस्ट डॉ. विनायगा पंडियन म्हणाले, “आपल्या हृदयाला होणारा ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा अनियमित प्रकारे होतो, त्यामुळे रुग्णाला थोडा वेळ त्रास होतो, त्यानंतर बरे वाटते. या अधूननमधून जाणवणाऱ्या लक्षणांमुळे रुग्णाप्रमाणचे डॉक्टरांनाही हा अपचनाचा किंवा हृदयविकाराप्रमाणे लक्षणे असणाऱ्या इतर आजारांचा त्रास वाटू शकतो. “

“दुर्दैवाने, हृदयविकाराच्या गंभीर झटक्याच्या तुलनेतही स्टटरिंग हार्ट अटॅक अधिक गंभीर असतो. चाचण्यांच्या निकालांमुळे रुग्ण आणि डॉक्टर्स दोघेही उपचारांमध्ये विलंब करू शकतात आणि या विलंबामुळे हृदयाची अधिक हानी होत जाते. ही खरे तर कधीही स्फोट होणारी एक मोठी आपत्तीच असते.सुदैवाने, आम्ही वाट पाहत न बसता रुग्णाला लगेचच अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला,” असे डॉ. पंडियन पुढे म्हणाले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email