हिमाचल प्रदेशच्या निवडणुकित सलमान खान भाजप चा प्रचार करणार !!

  ऋतूराज पाटिल 

९ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशच्या निवडणुकी मधे प्रसिद्ध सिने अभिनेता सलमान खान भाजप उम्माद्वर चा प्रचार साठी उतरणार आहेत.या निवडणुकीत प्रत्येक पक्षाकडून फिल्मी कलाकारांना निवडणूक मैदानात उतरविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झाला आहे.आणि याचत भाजप नी जोर घेतली आहे

२०१४ मध्ये हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत काही बॉलिवूड कलाकारांनी भाजप आणि काँग्रेसचा प्रचार केला होता. यंदाही बहुतेक पक्ष या कलाकारांच्या संपर्कात आहेत. सलमान खानही हिमाचल प्रदेशात जाऊन प्रचारात भाग घेणार आहे. मात्र भाजपचे उमेदवार अनिल शर्मा यांचाच सलमान प्रचार करणार आहे. कारण शर्मा हे सलमानची बहिण अर्पिताचे सासरे आहेत. त्यामुळे तो केवळ शर्मा यांचाच प्रचार करणार असल्याचं सांगण्यात येतं. २०१४ मध्ये अभिनेत्री हेमा मालिनी आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपसाठी तर अमीषा पटेल यांनी काँग्रेसचा प्रचार केला होता.

येत्या ९ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. यावेळी राज्यातील सर्व पोलिंग स्टेशनांवर व्हीव्हीपीएटीचा वापर करण्यात येणार आहे. निवडणुकीत सर्व पोलिंग स्टेशनवर व्हीव्हीपीएटीचा वापर होणारं हिमाचल प्रदेश हे देशातील पहिलंच राज्य ठरणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email